चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
Wednesday, April 4, 2007
घन ओथंबून येती
घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती!
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती!!
घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती!
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती!!
घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले!
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला!!
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती!!
घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती!
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती!!
घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले!
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला!!
मी रात टाकली
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती
ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती
ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली
चांद केवडयाची रात
चांद केवडयाची रात, आलीया सामोरा
राजा माझ्या अंबाडयाला बांधावा गजरा
तुझ्या गाण्यानं वेढलं शाहीरा, माझं जीवन आलया मोहोरा
तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहीरा, मन वादळवार्यांत भोवरा
शुभ्र काचेत पारा, तसा संग साजुरा
हिरव्या आषाढ वनात डांगोरा, कसा पाण्यात लाविला अंगारा
जरा बांध गजरा, माझी आण शाहीरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा
राजा माझ्या अंबाडयाला बांधावा गजरा
तुझ्या गाण्यानं वेढलं शाहीरा, माझं जीवन आलया मोहोरा
तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहीरा, मन वादळवार्यांत भोवरा
शुभ्र काचेत पारा, तसा संग साजुरा
हिरव्या आषाढ वनात डांगोरा, कसा पाण्यात लाविला अंगारा
जरा बांध गजरा, माझी आण शाहीरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा
आज उदास उदास
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
राजसा जवळी जरा बसा
राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तुम्हाविण बाई
कोणता करु शिणगार, सांगा तरी काही
त्या दिसी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा, कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठांत
या तुम्ही शिकिवल्या खुणा
सख्या सजणा, देह सतवार
सोसता न येईल अशी दिली अंगार
मी ज्वार, नवतीचा भार
अंग जरतार, ऐन हुरडयात
तुम्ही नका जाऊ साजणा, हिवाळी रात
कोणता करु शिणगार, सांगा तरी काही
त्या दिसी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा, कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठांत
या तुम्ही शिकिवल्या खुणा
सख्या सजणा, देह सतवार
सोसता न येईल अशी दिली अंगार
मी ज्वार, नवतीचा भार
अंग जरतार, ऐन हुरडयात
तुम्ही नका जाऊ साजणा, हिवाळी रात
नभं उतरु आलं
नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात!
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिनरात!
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात!
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा!
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात!
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिनरात!
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात!
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा!
Subscribe to:
Posts (Atom)